सावर्डे : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिकामध्ये पपईपासून पौष्टिक व चविष्ट जॅम कसा तयार करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली. जॅम तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, त्यातील साखरेचे प्रमाण, शिजविण्याची योग्य पद्धत तसेच साठवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे फळप्रक्रिया उद्योगातून मूल्यवर्धन करून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येते, याची माहिती उपस्थितांना मिळाली. उपस्थितांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंकांचे निरसन करून घेतले.
हा उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी
निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी तसेच ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले “फलोद्यानशास्त्र विषयाचे प्राध्यापक रोशन मोहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अंतिम वर्षातील कृषीदूत शितल डोहळे वैष्णवी कोकरे मयूरी गावडे सानिका भोसले
