मंडणगड : मंडणगड शहरातील स्वागत लॉजच्या बाजूला जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंडणगड पोलिसांनी कारवाई केली.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात रात्री ६.२९ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संजय मनोहर खांबे (वय ४१, रा. तुळशी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास सुरेश मांडवकर यांनी फिर्याद दिली आहे.