लांजा : येथे अनोळखी इसमाचे रेल्वे ट्रॅकवर पडून निधन; निवसर येथे घटना.
निवसर रेल्वे लाईनवर सदर इसम पडून गंभीर दुखापत झाली. रेल्वे लाईनमन यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज दुपारी त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदर घटना लांजा पोलीस यांच्या हद्दीत घडल्याने प्रकरण लांजा पोलीसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी लांजाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे तपास करत आहेत.