लांजा (गोविंद चव्हाण): भारतामध्ये एक लाख विशाल हिंदू संमेलन होत आहेत. हिंदू समाजात हिंदुत्व जागृत होण्यासाठी ही संमेलन आयोजित केली जात आहेत. आईच्या उदरात असताना आम्ही जन्माला येताना कोणतेही लेबल घेऊन आलेलो नाही. जात-पात, संघटना व वाईट गुणांचा त्याग करतो तो हिंदू आहे. दुष्ट गुणांचा त्याग करून पुनर्जन्म भोगतो तो हिंदू आहे. वेदांत मानतो तो हिंदू.

सावरकर यांनी हिंदूची व्याख्या तयार केली आणि ती व्याख्या संविधानाने मान्य केली आहे. पुण्यभूमीपासून सिंधू नदीपर्यंत भारतात धार्मिक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे भारतातील हिंदूंना बाहेर जाण्याची गरज भासत नाही, असे सावरकर यांनी सिद्ध केले असून ते भारतीय संविधानानेही मान्य केले आहे.

भारत देशाला संपवायचे असेल तर संस्कृती नष्ट केली पाहिजे, शिक्षण बंद केले पाहिजे. देवाकडे जाताना देह लागतो आणि देशही लागतो. भारतदेशात नऊ लाख हिंदूंचे धर्मांतर झाले; त्यांची संख्या वाढू लागली. आणि आपल्या हिंदूंमध्ये ‘हम दो हमारे दो’ त्यामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. जिहादी लोक म्हणतात: पुण्यभूमी नसून नापीक भूमी आहे; ती पापी भूमी आहे. आणि तुम्ही म्हणता, “आम्ही सारे भाऊ भाऊ.” तुमचा भाऊ गुरांचे मांस खाणार, तो भाऊ कसा होणार? सनातन हिंदू धर्म आहे; त्याची संस्कृती आहे; ईश्वर कणाकणात आहे. भारताचे करतो त्याला भाऊ मानतो. भारतात ५७ देश आहेत; त्यांना ५२ देशांनी सांगण्याची गरज नाही.

लांजा येथील संतोष आग्रे, संजय आग्रे यांच्या गणेश मंगल कार्यालयात हिंदू संमेलन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख सुधाकर शेट्ये, स्मिता दळवी, सुचिता भागवत होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते चंद्रकांत राऊळ (कणकवली) होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, पुष्पहार व गीतगायन करून करण्यात आली. सूत्रसंचालन अनूप सरदेसाई यांनी केले, तर आभार मनोज भागवत यांनी मानले.