चिपळूण- युनिटी सोशल ग्रुप, गोवळकोट रोड, चिपळूण पेठमाप यांच्या वतीने नाईक पूल ते गोवळकोट करंजेश्वरी कमान या सुमारे १ कि.मी. परिसरातील रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांबाबत चिपळूण नगरपरिषद प्रशासनास तातडीचे निवेदन सादर करण्यात आले.
सदर मार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच गंभीर अपघात होण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या जीविताची व सुरक्षिततेची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी संबंधित रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून सर्व खड्डे तात्काळ भरावेत, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी युनिटी सोशल ग्रुप, गोवळकोट रोड, चिपळूण पेठमापचे अध्यक्ष मुबारक शाह, रईसभाई अल्वी, खालिद जसनाईक, रेहान रुमानी, मुन्ना जसनाईक तसेच बशीर खेडेकर आदी उपस्थित होते.
युनिटी सोशल ग्रुपने प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक ती दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
