सिंधुदुर्ग : विरोधकांवर, जरांगे, धर्म स्वातंत्र्य कायदा आणि नेपाळसह विविध मुद्द्यांवर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया….

  • केजरीवाल यांच्या लाँग मार्चवर: पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचे महत्त्व विरोधकांना समजत नसल्याची टीका; केंद्र सरकार हा विषय योग्य पद्धतीने हाताळेल, असे मत.
  • मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावर: सरकारचा जरांगे यांच्याशी सकारात्मक संवाद असून मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढू, असे आश्वासन.
  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘झेन जी संवाद’ उपक्रमावर: तरुणांशी संवाद साधून राष्ट्र अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह असल्याचे मत.
  • धर्म स्वातंत्र्य कायद्यावर: सरकारने दिलेला शब्द पाळला असून कायद्यामुळे महिलांच्या सुरक्षेला बळ मिळेल, असा दावा.
  • बिहार पोटनिवडणुकीवरील आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर: ठाकरे यांच्यावर टीका करत जनतेच्या कौलाचा आदर असल्याचे सांगितले.
  • नेपाळच्या हिंदू राष्ट्राच्या दिशेने वाटचालीवर (हिंदी): नेपाळ हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे स्वागत; भविष्यात आणखी हिंदू राष्ट्रे निर्माण होतील, असे वक्तव्य.
  • धर्म स्वातंत्र्य कायद्यावर (हिंदी): कायद्यामुळे हिंदू महिलांच्या सुरक्षेला बळ मिळेल, असा दावा करत हिंदू कार्यकर्त्यांचे श्रेय मान्य केले.