परशुरामनगर, चिपळूण : प्रभाग क्रमांक – ९ (नऊ) नगरसेवक शशिकांत मोदी व नगरसेविका अंजली कदम यांच्या तर्फे प्रभागातील तसेच शहरातील महिलांसाठी विविध प्रकारच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

दि. १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या कालावधीत बेसिक ब्युटी पार्लर वर्कशॉप, नऊवारी साडी ड्रेपिंग, मेकअप, पाईप क्लिनरपासून फुले बनविणे, जुन्या कापडापासून शोभिवंत तोरणे, समई डेकोरेशन, केळीच्या पानांपासून सजावटीच्या वस्तू तसेच देवांचे वस्त्र बनविणे अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले.

एकूण ५० महिला तसेच युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

प्रशिक्षिका रुची बिर्जे व त्यांच्या संपूर्ण टीमने महिलांना उत्कृष्ट प्रकारे प्रशिक्षण दिले.

सर्व महिलांनी नगरसेवक शशिकांत मोदी व नगरसेविका अंजली कदम यांचे आभार मानले.

यावेळी आशाताई मोदी, रस्मीता पोल्लाई, दक्षता मोरे, अमिशा फडकल, रिया पाथरे तसेच भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रुही खेडेकर उपस्थित होत्या.