दापोली : भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली यांच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार 21 ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. ही सभा दापोली येथील पेन्शनर हॉल, नर्सरी रोड, टेलिफोन एक्स्चेंजजवळ संस्थेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, संस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापक यांनी केले आहे.
सभेमध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक व ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद मंजूर करणे, संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा विभागणीस मान्यता देणे, तसेच व्यवस्थापक समिती सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या कर्ज व वसुलीची नोंद घेणे.
याशिवाय, चालू आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती, पुढील वर्षासाठी
बाहेहरील वाढीव कर्जमर्यादा निश्चित करणे, सन २०२६-२०२७ चे अंदाजपत्रक मंजूर करणे, शासकीय लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, तसेच विशेष सन्मान प्राप्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने सभासदांनी आलेल्या लेखी सूचनांचा, ऐनवेळच्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी पुन्हा सभा घेण्यात येईल. सभासदांनी आपापल्या सूचना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात. तसेच वार्षिक अहवालाची प्रत आवश्यक असल्यास सभेपूर्वी चार दिवस अगोदर कार्यालयातून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी, 80% बारावी 70% तसेच पदवी व पदव्युत्तर 60% परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले असल्यास किंवा शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केले असल्यास त्यांची माहिती १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी संस्थेकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.