महाड ( मनोज खांबे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी महाडमध्ये टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा थरार मोठ्या स्क्रीनवर अनुभवत भारताच्या विजयाचा आनंद जल्लोषात साजरा केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापन दिन काल सोमवारी किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होणार होता त्यानिमित्त एक दिवस आधीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे,शर्मिला ठाकरे,अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी महाडमध्ये दाखल झाले होते.
हॉटेल विसावा येथे ठाकरे कुटुंबीय रात्री मुक्कामाला आले होते.सायंकाळी भारत आणि न्युझीलँड यांचा t20 वर्ल्ड कप चा अंतिम सामना असल्यामुळे ठाकरे कुटुंबीयांना हा सामना स्क्रीनवर पाहता यावा यासाठी हॉटेल विसावा येथे मोठा स्क्रीन लावण्यात आला होता.
या स्क्रीनवरच अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा अंतिम पाहिला. भारताने शानदार कामगिरी करत विजय मिळवताच उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.यावेळी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही उपस्थित नागरिकांसोबत जल्लोषात सहभाग घेत भारतीय संघाचे अभिनंदन केले. भारताच्या विजयाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
