आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयात “एक राखी सैनिकांसाठी “उपक्रम आयोजित करण्यात आला असून लोक शिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालयात देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक राखी सैनिकांसाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या राख्या भारत देशाच्या सीमेवर लढाणाऱ्या जावानांसाठी चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली या विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाठविल्या
“एक राखी सैनिकांसाठी”या उपक्रमा अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रेम आपुलकी आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या राख्या तयार करून देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असलेल्या वीर सैनिकांना पाठवण्यात आल्या रात्रीच्या माध्यमातून सैनिकांप्रती आदर कृतज्ञता आणि बंधुभाव व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गिरी सर, आबलोलीचे पोस्ट मास्तर श्री. गुढेकर, काजूर्लीचे पोस्ट मास्तर श्री गुरव, मासू गावचे पोस्टमन चंद्रकांत यमलवाड, आबलोली गावचे पोस्टमन सुशांत साळवी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकां प्रति कृतज्ञ तेची भावना वृद्धिंगत झाली . चला,एक राखी, एक प्रेमाचा संदेश आपल्या वीर सैनिकांसाठी या संदेशातून विद्यार्थ्यांनी देश रक्षण करणाऱ्या जवानांना प्रेमाची अनोखी भेट दिली
या उपक्रमाला भारत सरकार पोस्ट विभागाचे सहकार्य लाभले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि संबंधित पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
देशाच्या सीमेवर लढाणाऱ्या जवानांसाठी चंद्रकांत बाईत विद्यालयातर्फे पाठविल्या राख्या .
