मुंबई : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीने एक प्रचार समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, CWC सदस्य व माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनुसुचित जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, खासदार बळवंत वानखडे, आमदार अनिल (बाळासाहेब) मांगुळकर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख, आमदार अमीत झनक, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आमदार साजिद खान पठाण, आमदार धिरज लिंगाडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, डॉ. वजाहत मिर्झा, राजेश एकडे, राहुल बोंद्रे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष हरिष भैय्या पवार, बलदेव महाराज राठोड, लक्ष्मणराव घुमरे, संजय राठोड, मिर्झा अरिज बेग, डॉ. झिशान हुसेन, अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अनिरुध्द देशमुख, अमरावती शहराध्यक्ष बबलु शेखावत, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक, बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार, अकोला ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश तायडे, अकोला शहर कांग्रेसचे अध्यक्ष महेंद गवई, वाशिमचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौधरी, अशोक अमानकर, अॅड. प्रफुल मानकर, स्वाती वाकेकर, विलास इंगोले, अशोकराव बोबडे, दिलीप एडतकर, दिलीप सरनाईक, हरिभाऊ मोहोड, श्याम उमाळकर, किशोर बोरकर, माधुरी आडे, महेश गणगणे, मिलींद चिमोटे, नदीम मोहम्मद, रामविजय बुरुंगले, अरविंद कोलते, अक्षय राऊत, चंद्रकांत साठे, जावेद सौदागर, जावेद अंसारी, नझीर खान बशीर, प्रशांत पाचाडे, समीना शेख, संजय खाडे, संजय वानखेडे, सोनाली लांडगे, हरिष रावळ यांचा समावेश आहे.

याबरोबरच अमरावती मतदारसंघातील प्रचारासाठी विविध संघटनांबरोबर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री वसंत पुरके, आमदार धीरज लिंगाडे व प्रदेश सरचिटणीस मिलिंद चिमोटे यांची समिती गठीत केल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.