भडगाव : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेमध्ये शालांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शन 6 वी ते 8 वी व इयत्ता 9 वी ते 12 वी या गटामध्ये भरविण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. मधुर माधव पेठे, अध्यक्ष, JCI खेड, मा.श्री. हेमंत चिखले उपाध्यक्ष, JCI खेड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम सर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे मॅडम, परीक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये इ. 6 वी ते 8 वी च्या गटातील प्रतीकृतींचे परीक्षण श्रीमती आयेशा सांगले मॅडम, सहा. शिक्षिका, एस. एम. इंग्लिश मेडीअम स्कूल व श्री. विजय श्रीधर शिंदे सहा. शिक्षक, श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव यांनी केले. तर इ. 9 वी ते 12 वी च्या गटातील प्रतीकृतींचे परीक्षण श्री. राजेश किटटद, सहा. शिक्षक, ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (CBSE), मोरवंडे-बोरज व सौ. अनन्या दळवी मॅडम सहा. शिक्षिका, ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (CBSE), यांनी केले. विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत व्हावा यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण 58 प्रतिकृती सादर केल्या होत्या. त्यामध्ये इ. 6 वी ते 8 वी च्या गटातून इ. 6 वी तील हिमांशू कुलकर्णी या विद्यार्थ्यांच्या ‘ A.I’ या प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक, इ. 6 वी नीतिशा खेडेकर व आराध्या भोसले यांच्या ‘Smart Street Light’ या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक तसेच इ. 8 वी तील श्रेया गीते व स्नेहा कदम यांच्या ‘indigenous Agricultural practices’ या प्रतिकृतीचा तृतीय क्रमांक आला आहे. तसेच इ. 8 वी तील स्वराज तांबे व राज देशमुख या विद्यार्थ्यांच्या ‘Water Dispenser’ या प्रतिकृतीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला आहे.
त्याचप्रमाणे इ. 9 वी ते 12 वीच्या गटातून इ. 11 वी CET तील हर्ष थळकर व रोशनअली शेख या विद्यार्थ्यांच्या ‘A.I for better life’ या प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक, इ. 11 वी विज्ञान CET मधील मयुरेश भाट व तनिष काणेकर या विद्यार्थ्यांच्या ‘A.I’ या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक, इ. 9 वी तील सोहम मोहिते व हर्ष बांगर यांच्या ‘Making petrol from air & water’ या प्रतिकृतीचा तृतीय क्रमांक तर इ. 11 वी JEE तील आर्य चिले व स्वरूप कांचनकोटी या विद्यार्थ्यांच्या ‘Chemicalless vegetable’ या प्रतिकृतीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रागिणी जामकर, माधुरी लेले, साधना थोरात, मानसी मनवळ, दीपक यादव यांनी विशेष मेहनत घेतली.सदर उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व शुभेच्छा दिल्या.
