खेड : वाढदिवसाचे औचित्य साधत जलसंवर्धनाचा सामाजिक उपक्रम; पाणी अडवा, पाणी जिरवा या संदेशातून भविष्यातील जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न खेड शहरावर दुष्काळाचे सावट येऊ नये, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता यावी आणि भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलसाठ्यात वाढ व्हावी, या सामाजिक उद्देशाने भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभवजी खेडेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जलसंवर्धनाचा अनोखा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून नारंगी नदी परिसरात वनराई बंधारा बांधण्याच्या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ ॲड.वैभवजी खेडेकर यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आला.
वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श ॲड.वैभवजी खेडेकर यांनी या उपक्रमातून घालून दिला आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढवणे, भूजल पातळी सुधारण्यास मदत करणे तसेच स्थानिक परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
नारंगी नदी खेड येथे वनराई बंधारा उभारण्याच्या संकल्पनेतून जलसंवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खेड शहर आणि परिसरात भविष्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
“पाणी अडवा, पाणी जिरवा” या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत नागरिकांनीही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. नारंगी नदीतील पाण्याचा साठा वाढविणे, स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि दुष्काळमुक्त खेडच्या दिशेने सामूहिक प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा व्यापक संकल्प आहे.
यावेळी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ.वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष श्री.निलेश बामणे, मा.नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा सौ.आशा सनगरे, भाजपा खेड शहर शक्तिकेंद्र प्रमुख श्री.वैजेश सागवेकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, कु.स्वराज गांधी, श्री.विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड कु.अविराज मोरे, श्री.परशुराम दवंडे, श्री.रुपेश तरडे, श्री.नंदू शिर्के, रोहित भुवड, अक्षय सनगरे, जयेश गुहागरकर, भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.