खेड : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दापोली वर्षावास प्रवचन मालिका 2026 अंतर्गत समारोपीय वर्षावास प्रवचन कार्यक्रम शहरशाखेच्या माध्यमातून संपन्न झाला संस्थेच्या आदेशानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिका पार पडली १३ ग्रामशाखांनी यात उस्फुर्त सहभाग घेऊन ही मालिका यशस्वी संपन्न केली असून आज दिनांक २५/१०/२०२६ रोजी शहरशाखेच्या माध्यमातून समारोपीय कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख प्रवचनकार म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरीचे सरचिटणीस आद एन बी कदम गुरुजी हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक शाखेचे अध्यक्ष आद.गमरे हे होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयु. म्हस्के यांनी केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दापोली चे अध्यक्ष अनिल घाडगे, सचिव अशोक जाधव , संस्कार विभाग उपाध्यक्ष साहिल घाडगे , संस्कार विभाग सचिव आयु.आनंद शेळके तालुका संघटक तानाजी जाधव व बाबुराव जाधव , तालुका महिला विभागाच्या प्रमुख भुमिका जाधव व पदाधिकारी तसेच जिल्हा महिला संघटक सुशांती शिर्के, आयु.पैठणे हे मान्यवर उपस्थित होते तर विविध ग्रामशाखांमधून पदाधिकारी तथा बंधू भगिनी उपस्थित होते त्यात पिसई, ओणनवसे, पणदेरी, कुंभवे, टांगर, रेवली पिचडोली, मातवन पचवली, कोंढे, भोमडी,खातलोली,मुगीज, टाळसुरे, वळणे, कळंबट या शाखेतून उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहिल घाडगे, आयु पैठणे सर अशोक जाधव गुरुजी,अनिल घाडगे गुरुजी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले शहरशाखेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवर तथा शाखांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि सोबत भारतीय संविधानाची प्रत भेट देत स्वागत तथा सन्मान केला आणि मग प्रवचनकार मान एन बी कदम गुरुजी यांनी आपल्या विषयाला सुरुवात केली डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर अतिशय सोप्या भाषेत विषयातील बारकावे ऐतिहासिक संदर्भ देत गुरुजींनी विषय मांडला अतिशय प्रभावी आणि ऊर्जादायक आणि प्रेरणादायी मांडणीनंतर विषय पूर्ण झाला यानंतर वर्षावास प्रवचन मालिकेत सहभागी ग्रामशाखांचा सन्मानपत्र देत सन्मान करण्यात आला अखेर आभार प्रदर्शन होऊन सारणतय होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.