मुंबई : महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव उद्या दिनांक 1 मे रोजी बुद्धपौर्णिमेला घाटकोपर पश्चिम भीमनगर येथील जयभवानी विकास मंडळ येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे.
भीमनगर मधील जय भवानी विकास मंडळाच्या धम्मत्न बुद्धविहाराचे आमदार राम कदम यांच्या प्रयत्नातून नूतनीकरण करण्यात आले असून या बुद्धविहार नवीन बुद्धमूर्ती स्थापना यावेळी पूजू भिक्खू संघ आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.ही बुद्धमूर्ती येथील घोडेस्वार परिवाराच्या वतीने बुद्धविहाराला धम्मदान म्हणून देण्यात आली असून दिवंगत शंकर रणपिसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा धम्मत्न बुद्धविहाराला धम्मदान म्हणून देण्यात आला आहे अशी माहिती जय भवानी विकास मंडळाच्या वतीने समाजसेवक डॉ.निलेश बनसोडे यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे संयोजन जय भवानी विकास मंडळाचे अध्यक्ष मयुर चाबुकस्वार; सचिव उमेश गायकवाड आणि खजिनदार हितेश जगताप सह सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
