पोलादपूर : तालुक्यातील बोरज गावात एका घराला अचानक आग लागल्याची घटना १ नोव्हेंबर २६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही आग वीज पडून लागल्याचे पंचनामा दरम्यान सांगण्यात आले आहे. या आगीत घर व घरातील साहित्यसह सुमारे ३ लाख ३३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्यादरम्यान तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
तालुक्यात आगीच्या घटनेची माहिती मिळताच महाड अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली असून, रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांच्यासह पोलीस व शासकीय अधिकारी मंगेश पवार व ग्राम महसूल अधिकारी फिरोज मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरज गावातील रहिवासी अशोक चंदू झाडाणे यांच्या घराला विज पडून आग लागल्याची माहिती पंचनाम्यादरम्यान समोर आली आहे.
श्री अशोक झाडाणे हे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईतील दिवा येथे वास्तव्यास आहेत.
घरातील मालमत्तेचे पंचनाम्यादरम्यान घर व घरातील सर्व नुकसानीची आकडेवारी भांडीकुंडी सुमारे ३५०००/-, धान्य व कडधान्य सुमारे २५०००/- फर्निचर सुमारे ४५०००/- टीव्ही व सुमारे ३६०००/- इतर इलेक्ट्रिक वस्तू सुमारे नुकसान २० ते २५ हजार, वापरातील कपडे सुमारे १० ते १५ हजार रुपये आणि घरातील रोख रक्कम ५० हजार रुपये यासह संपूर्ण घराचे नुकसान मिळून सुमारे3 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्यात नमूद करण्यात आली आहे.