चिपळूण : गोवळकोट पंप हाऊस येथून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाइपलाइनचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी काही भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

या पाणीपुरवठा बंदमुळे गोवळकोट गाव, पेठमाप, गोवळकोट रोड तसेच उक्ताड ते भेंडीनाका परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या पाणीपुरवठ्याचा लाभ मिळणार नाही.

त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक तेवढा साठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा, असे आवाहन चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.