चिपळूण : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागा मध्ये श्री रामवरदायीनी देवीच्या वार्षिक यात्रे दरम्यान दिनांक 18/ 04 /2026 रोजी प्रा.आ.केंद्र दादर येथे नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी दसपटी भागातील 80 गरजू वं जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला असून या शिबिराला तब्बल नऊ वर्ष पूर्ण झाली.

सदरचा उपक्रम हा आपल्या आजूबाजूच्या खेडोपाड्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा आणि येणाऱ्या काळात असे अनेक आरोग्यावर शिबीर घेऊ आणि आमच्या माता भगिनी व जेष्ठ नागरिकांची सेवा करू ही सेवा करत असताना माझ्या सोबत भास्कर शिंदे, तानाजी शिंदे, दिपक र. शिंदे, प्रदीप दत्ताजी शिंदे, विजय शिंदे, प्रथमेश शिंदे आणि प्रवीण शिंदे यांच नेहमीच फार विशेष सहकार्य देखील असत.

यावेळी रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, चिपळूण पंचायत समिती चिपळूण सदस्य विनोद भुरण, चिपळूण पंचायत समिती सदस्या सौ.मेघाताई इंगावले, शुभम पिसे आरोग्य सभापती नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी डॉ.रवि धनवे, सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन चे श्री.प्रमोद शिंदे, अनंत शिंदे, प्रदीप शिंदे, दिपक शां. शिंदे, पत्रकार दिपक शिंदे, अनिल कलकूटगी, महेश शिंदे, तसेच दसपटी विभागातील ग्रामस्थ, प्रा.आ.केंद्र दादरचे सुधा गुंजाळ वैध्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक राजेंद्र मोळाज, अभिजित कमलाकर यादव, दर्शना खंदारे, काशिफा शिकलगार औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक रविंद्र पाटील, प्रसाद पवार, सागर गायकवाड, नरेंद्र महाडिक, अर्चना सुर्वे आरोग्य सेविका, परिचर संजय जाधव आणि सर्व आशा सेविका उपस्थित होते.