चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांनी सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट देत शहरातील विविध विकासकामे तसेच स्थानिक पर्यटनस्थळांची पाहणी केली. यावेळी सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या आणि आगामी काळात प्रस्तावित असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती नगरसेविकांनी घेतली.
या भेटीदरम्यान सावंतवाडी नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींनी चिपळूणच्या नगरसेविकांचे स्वागत केले. सभापती आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर आणि प्रतीक बांदेकर यांनी सावंतवाडी शहरातील सुरू असलेल्या तसेच आगामी विकास प्रकल्पांची माहिती दिली.
यानंतर चिपळूणच्या नगरसेविकांनी सावंतवाडीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देत शहरातील पर्यटन विकासाची पाहणी केली. सावंतवाडीतील पर्यटन विकास व नगरपालिकेचे विविध प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी चिपळूणच्या नगरसेविकांनी व्यक्त केले.