दापोली : शिवसेना दापोली शहरप्रमुख, रिक्षा चालक-मालक युनियनचे मार्गदर्शक आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रसाद (पप्पू) रेळेकर यांचा वाढदिवस दापोली शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला गेला. दिवसभराच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांनंतर सायंकाळी अभिष्टचिंतन करून रेळेकर यांना विविध सामाजिक स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त शहरातील जि. परिषदेच्या शाळांना वह्या आणि शालेय साहित्यांचे वाटप केले गेले. त्याचप्रमाणे अन्नदान, रुग्णांना फळवाटप, वृक्ष वाटप अशा विविध लोकहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन दापोली शहर शाखेच्या वतीने करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता शिवसेना शहर शाखा, दापोली येथे प्रसाद (पप्पू) रेळेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, विधानसभा संघटक प्रदिप सुर्वे, जि. प. सदस्य किशोर देसाई, माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर शहर महिला आघाडी प्रमुख रसिका पेठकर युवा सेना दापोलीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रिक्षा चालक मालक संघटना, दापोली एस. टी. आगार कर्मचारी सेना, ई-बस चालक संघटना, दापोली आगार, जॉली स्पोर्ट्स क्लब, दापोली नगर पंचायत कर्मचारी संघटना, आणि विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देताना रेळेकर यांना त्यांच्या आगामी राजकीय प्रवासासाठी आणि आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी आणि विशेषत: शहर विकासासाठीच्या प्रत्येक कार्यात सुयश मिळो. अशा शुभेच्छा दिल्या.
दापोली शहरप्रमुख प्रसाद (पप्पू) रेळेकर यांच्या वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा…
