चिपळूण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात १३ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या संदेशासह आयोजित करण्यात येणाऱ्या या रॅलीत सर्व देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ही तिरंगा रॅली १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. रॅलीचा प्रारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून होऊन ती गांधी चौक, बाजारपेठ, चिपळूण येथे पोहोचणार आहे.

रॅलीमध्ये नागरिकांनी तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

या रॅलीच्या आयोजनामध्ये शहराध्यक्ष शशिकांत मोदी, संयोजक स्वाती देवळेकर, तसेच रुही खेडेकर, विनायक भैरवकर आणि श्री. अभिषेक साळुंखे हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत.

‘जय हिंद! वंदे मातरम्!’ या घोषणांनी चिपळूण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.