दापोली : JCI Dapoli च्या वतीने ‘JCI मॅरेथॉन 2026 – पर्व तिसरे’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता आझाद मैदान, दापोली येथून करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक पितांबरी अभिनव उत्पादने आहेत

“Run For Peace ! Run For Dapoli !!” हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये 5K Marathon आणि 2K Fun Run अशा दोन प्रकारांचा समावेश आहे. दापोलीकरांसह सर्व वयोगटातील नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार आहे.

5K Marathon तसेच 2K Fun Run मध्ये पुरुष व महिला गटासाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच 60 वर्षांवरील धावपटूंनी 2K Fun Run पूर्ण केल्यास विशेष पदक देण्यात येणार असून, सर्व सहभागी खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या मॅरेथॉनसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून, नोंदणी 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन व BIB वितरण 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य, फिटनेस, शांतता आणि दापोलीच्या सकारात्मक संदेशासाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन JCI Dapoli तर्फे करण्यात आले आहे.

या मॅरेथॉनसाठी JCI Dapoli अध्यक्ष JFM डॉ. कुणाल मेहता, सचिव JC HGF रोशन वेदक, प्रकल्प अध्यक्ष JC HGF मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक JC फैजान पुरकर आणि प्रकल्प समन्वयक JC पार्थ साबळे तसेच JCI Dapoli चे पदाधिकारी व सदस्य नियोजन व आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

JC HGF रोशन वेदक :
8446406668

JC HGF स्वप्निल मेहता :
9960199046

JFM तेजस मेहता :
8796282337

दापोलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘Run For Peace ! Run For Dapoli !!’ या संदेशाला साथ द्यावी, असे आवाहन JCI Dapoli तर्फे करण्यात आले आहे.