दापोली: गौ ग्रीन ॲप कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून दापोली शहरवासीयांसाठी भाजीपाला खरेदी सुविधा अधिक सोयीस्कर होणार असून याद्वारे ग्राहकांना घरपोच ताजा भाजीपाला ऑनलाइन मागवता येणार आहे. सदरचा प्रकल्प युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित पारदूले यांच्या कल्पनेतून आला आहे. या ॲप बद्दलची सविस्तर माहिती श्री.अमित पारदुले यांनी मंत्री महोदय तसेच उपस्थित मान्यवरांना समजावून सांगितली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.योगेशदादा कदम यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा सौ.अस्मिता केंद्रे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर,सभापती उन्मेष राजे, नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.