खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. 12 वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 2026 मध्ये झालेल्या Company Secretary Executive Entrance Test (CSEET) परीक्षेत युक्ता पराग मिर्लेकर व राद्नी कांचनगौरी बापट या दोन्ही विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश मिळविले आहे याबद्दल युक्ता, राद्नी व त्यांचे पालक यांचे संस्था व प्रशालेतर्फे हार्दिक अभिनंदन!
या विद्यार्थिनींना वर्गशिक्षक डॉ. चंद्रसेन घुंबरे, विठ्ठल सकुंडे, मारुती आडाव, अतुल आगलावे, संजय पाटील, रवींद्र ओकटे, कांतिनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, सुमित घाडगे, रामचंद्र भिंगारे, सुभाष चिनकटे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.