चिपळूण : आज दिनांक 27 सप्टेंबर, 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह चिपळूण येथे गोडबोलेज् क्लासेसच्या इयत्ता नववी वर्गाची पालक- विद्यार्थी- शिक्षक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शालेय मूल्यमापन ,परीक्षा पद्धती ,अभ्यासातील सातत्य, परीक्षेची तयारी आणि उपस्थिती इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली या सभेला 100 पेक्षा जास्त विद्यार्थी- पालक उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. अमेय गोडबोले सर, श्री. अनिकेत गांधी सर, श्री. किशोर कापडी सर तसेच कु. अल्मिरा वांगडे मॅडम यांनी आपापल्या विषयांचे मार्गदर्शन केले . अशा पद्धतीने पालक विद्यार्थी शिक्षक सभेचे आयोजन करणारा गोडबोलेज् क्लासेस यांचा हा अभिनव उपक्रम पालकांच्या पसंतीस उतरला व त्यांनी या कार्यक्रमाचे भरघोस असे अभिनंदन व कौतुक केले व भविष्यात असेच उपक्रम राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अनिकेत गांधी सर यांनी सभेस उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.