रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा १० ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, राजापूर येथे १४, १७ व १९ वर्षे वयोगटांत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक व जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, स्पर्धा आयोजक व राजापूर तालुका अध्यक्ष अभिजीत तेली, तसेच तालुका पदाधिकारी मुकेश नाचरे, सचिव लक्ष्मण कररा व पंचप्रमुख भरत कररा आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर, चिपळूण, खेड, रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली व गुहागर तालुक्यांतून सुवर्णपदक पटकावलेले खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत संगमेश्वरच्या तायक्वांदोपटूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत ९ सुवर्णपदके, ९ रौप्यपदके व ५ कांस्यपदके पटकावून तृतीय क्रमांकाचा चषक मिळवला. या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड १ ते ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रेणुका हॉल, वाठार, तळसंदे रोड, तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.
पदकप्राप्त खेळाडू पुढीलप्रमाणे :
मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवली
१४ वर्षांखालील मुली :
१. दुर्गा मोघे — कांस्यपदक 🥉
२. सांची मुंडेकर — सहभाग
१४ वर्षांखालील मुले :
१. आर्य भोसले — सहभाग
२. सोमांश सावंत — सहभाग
१७ वर्षांखालील मुली :
१. सिया सागवेकर — सुवर्णपदक 🥇
१७ वर्षांखालील मुले :
१. आदित्य चिपळूणकर — सुवर्णपदक 🥇
१९ वर्षांखालील मुली :
१. भूमिका शिंदे — सुवर्णपदक 🥇
२. समृद्धी घडशी — कांस्यपदक 🥉
अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुख
१४ वर्षांखालील मुली :
१. रितिशा कांगणे — सुवर्णपदक 🥇
१४ वर्षांखालील मुले :
१. अधिराज कदम — सुवर्णपदक 🥇
२. वेदांत मसुरकर — कांस्यपदक 🥉
१७ वर्षांखालील मुले :
१. यशराज कटके — सुवर्णपदक 🥇
२. साहिल जागुष्टे — कांस्यपदक 🥉
३. शौर्य लोध — सहभाग
आश्रमशाळा, निवे बु.
१४ वर्षांखालील मुली :
१. भक्ती गुरव — रौप्यपदक 🥈
२. स्वरा धोपावकर — कांस्यपदक 🥉
१७ वर्षांखालील मुली :
१. सान्वी रसाळ — रौप्यपदक 🥈
१७ वर्षांखालील मुले :
१. आर्यन यादव — रौप्यपदक 🥈
२. ऋतिक रसाळ — रौप्यपदक 🥈
३. युवराज केतकर — सहभाग
१९ वर्षांखालील मुली :
१. सान्वी जाधव — रौप्यपदक 🥈
लोक विद्यालय, तुळसणी
१७ वर्षांखालील मुली :
१. श्रावणी ईप्ते — सुवर्णपदक 🥇
२. मृणल जाधव — सहभाग
ताम्हणे हायस्कूल
१४ वर्षांखालील मुले :
१. प्रभात रहाटे — सहभाग
१७ वर्षांखालील मुली :
१. पूर्वा रहाटे — सहभाग
न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख
१४ वर्षांखालील मुले :
१. अफजान फुलारी — सुवर्णपदक 🥇
१९ वर्षांखालील मुली :
१. सान्वी जागुष्टे — रौप्यपदक 🥈
२. सेजल बावधने — रौप्यपदक 🥈
पैसाफंड हायस्कूल, संगमेश्वर
१४ वर्षांखालील मुले :
१. पियुष रहाटे — रौप्यपदक 🥈
१७ वर्षांखालील मुले :
१. प्रथमेश शेट्ये — रौप्यपदक 🥈
न्यू इंग्लिश स्कूल, कसबा
१७ वर्षांखालील मुले :
१. सोहम चव्हाण — सुवर्णपदक 🥇
दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी
१७ वर्षांखालील मुली :
१. श्रेया मोरे — सहभाग
या यशस्वी तायक्वांदोपटूंचा छोटेखानी सत्कार समारंभ नगरपंचायत, देवरुख येथे संपन्न झाला. या वेळी तालुका अकॅडमीच्या उपाध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, संदेश जागुष्टे आदी उपस्थित होते. स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, मयुरी राऊत व करण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव अभिजीत शेट्ये, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ. पूनम चव्हाण, खजिनदार चिन्मय साने, स्वाती नारकर, पालक प्रतिनिधी व सर्व नगरसेवक आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
