लांजा : लांजा तालुक्यातील ‘कलारंग थिएटर्स, लांजा ‘ या नाट्य व सांस्कृतिक संस्थेच्यावतीने लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असणाऱ्या ‘माचाळ’ पर्यटनस्थळी स्वच्छता व साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
सद्या पावसाळा सुरू होत असून माचाळ मध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या भागातून असंख्य पर्यटक वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ मध्ये उन्हाळी व हिवाळी व पावसाळ्यात ही पर्यटक माचाळ मद्ये दाखल होत आहेत. यावर्षी उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन असतानाही पर्यटक माचाळकडे दाखल झाले होते. येथील सह्याद्रीचे डोंगरकडे, थंड गार वारा, नागमोडी वळणे, नजसरेस पडणारे पशु-पक्षी, प
पक्षांचे आवाज, गडद वनराई हा निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी माचाळ पर्यटनाला नागरिकांची गर्दी होत असते.
दरम्यान ‘लांजा तालुक्यातील कलारंग थिएटर्स, ‘ लांजा या नाट्य संस्थेच्यावतीने निसर्गसहल व माचाळ परिसर स्वच्छता असा उपक्रम बुधवार दि. १७ जून रोजी राबविन्यात आला. यावेळी स्वछता उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थेच्या सर्व सदस्यांनी माचाळ मधील महत्वाच्या असणाऱ्या ठिकाणी साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. त्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या काळातील पाणवठ्याची स्वच्छता केली. यासह उन्हाळ्यात माचाळ परिसर ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी केलेला कचरा यामध्ये प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कागद, पाला-पाचोळा गोळा करून एका बाजूला दुरवरील झाडीमध्ये नेऊन टाकला. त्यामुळे कलारंग थिएटर्स लांजा, या संस्थेने माचाळ परिसरात स्वच्छता राबऊन माचाळ येथे येणाऱ्या पर्यटकांना ” आपला परिसर, स्वच्छ परिसर ” असा संदेश दिला आहे. स्तुत्य उपक्रम राबविल्याने कलारंग थिएटर्स लांजा या नाट्य संस्थेचे तालुक्यातून कौतुक केले जाते आहे.
कलारंग थिएटर्स लांजाच्यावतीने माचाळ येथे परिसर स्वच्छता.
