खेड : जेसीआय खेडचा ४५ वा पदग्रहण सोहळा आज, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. खेड जेसीआयच्या नूतन अध्यक्षपदी मधुर पेठे, तर सचिवपदी अमित गरुड यांचा शपथविधी तसेच त्यांच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच अलमदिना वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष बशीर हजवानी, खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, गोवा येथील झोन अध्यक्ष चेतन सालेलकर आणि झोन उपाध्यक्ष सृष्टी नागवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी वर्षभरात जेसीआयच्या ज्या सभासदांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

गोवा विभागीय स्तरावर खेड जेसीआयला जेसी फेस्टिव्हलच्या उत्कृष्ट आयोजनासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. नूतन अध्यक्ष मधुर पेठे तसेच अमित गरुड यांनी वर्षभर जेसीआयसाठी मोठे योगदान दिल्यामुळे त्यांची या पदांवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षीही उत्तम कामगिरी होईल, अशी अपेक्षा मावळते अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी व्यक्त केली. या पदग्रहण सोहळ्याला खेडमधील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी केले आहे. राहावे, असे आवाहन अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी केले आहे.