खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर थेट नदीच्या पात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून, अद्याप या अपघाताबाबत सविस्तर माहिती हाती आलेली नाही.
तसेच या दुर्घटनेत जीवितहानी किंवा इतर काही हानी झाली आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीचा हा पूल अत्यंत धोकादायक पूल म्हणून ओळखला जातो. यापूर्वीदेखील या पुलावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिक तपशील मिळू शकलेला नाही.
