चिपळूण : खेर्डी MIDC परिसरातील २० गुंठे क्षेत्रात असलेल्या ‘इम्पेरियल इंडस्ट्रीज’ या फर्निचर कारखान्याला दि. 23 सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ऑस्ट्रेलियावरून मागवलेल्या १२ आधुनिक मशिनरी, तयार फर्निचर, रॉ मटेरियलसह संपूर्ण कारखाना जळून खाक झाला.
या घटनेची माहिती मिळताच आज कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत दादा सुनिल तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी कारखान्याचे मालक निहालभाई मालानी यांची भेट घेऊन दुर्घटनेची माहिती घेतली व शासन दरबारी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ शेठ खताते, तालुकाध्यक्ष नितीन (अबुशेठ) ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, उपसरपंच अभिजीत खताते, सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, राजेश सुतार, विनोद खताते, गण अध्यक्ष गणेश भुरण, सचिन ठसाळे, सचिन भोसले, भाऊ भुरण, राजेश भुरण तसेच MIDC अधिकारी, पोलीस अधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते….
