मंडणगड : जागृत व तालुकावासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या कुंबळे येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या खेड पुरार राज्य महामार्गलगत नव्याने उभ्या करण्यात आलेल्या प्रवेशद्वार कमानिचे १६ऑक्टोबर २०२६ रोजी नामदार योगेश कदम यांच्याहस्ते फित कापुन व श्रीफळ वाढवुन उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास जि.प.अध्यक्षा अस्मिता केंद्रे सभापती प्रणाली चिले उपसभापती दीपक मालुसरे जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर शहर प्रमख विनोद जाधव नितीन म्हामुणकर अनंत शिंदे सरपंच सानिका पाटील अनंत केद्रे संदेश लोखंडे इरफान बुरोंडकर गणेश बिल्लार माजी सरपंच किशोर दळवी ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. मंदीर पंच कमिटीचे प्रमुख किशोर दळवी यांनी नामदार योगश कदम सांच्याह सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आजचा दिवस गावाचे इतिहासात सोन्यासारख्या दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा आनंदाचा दिवस आहे. श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर सुंदर अशा पद्धतीचा प्रवेशद्वार पंच कमिटी गावातील सर्व वाड्या तसेच सर्व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन महालक्ष्मी मातेचे प्रवेशद्वार अहोरात्र प्रयत्न करुन पुर्ण केले व या प्रवेशद्वाराचे राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते फीत कापून भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. गावाने श्री महालक्ष्मी मंदिर बांधल्यानंतर ज्या गोष्टीची कमतरता होती ती आता पूर्ण करण्यात आली यापेक्षा मोठा आनंद काय असावा ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईकर आणि स्थानीक ग्रामस्थ आनंदी आहेत अशी प्रतिक्रिया पंच कमिटीचे प्रमुख श्री किशोर दळवी यांनी या निमीत्ताने दिली.