लांजा : प्रती वर्षाप्रमाणे यावर्षीही लांजा तालुका चैतन्य वारकरी मंडळाचे दिंडी प्रमुख ह.भ.प.प्रकाश गंगाराम कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पौलतेश्वर मंदिर येथून प्रस्थान होऊन दिंडी मार्गस्थ झाली . लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत लांजा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, गुरूप्रसाद देसाई शिवसेनेचे कार्यकरते व वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.जुगाई मंदिर,भगवती मंदिर,जाकादेवी मंदीर केदिरलिंग मंदीर, हायवे रस्ता, कुंभार वाडी आसगे,जि.प.शाळाद दख्खन,बालदास मठ शिरगाव,निनादेवीमंदीर रेठरे, भैरवनाथ मंदिर भिलवाडी,मायाक्का मंदीर बिरवाडी, आटपाडी अध्यापक विद्यालय,जाधवाडी महूद, पंढरपूर याठिकाणी मुक्काम होणार यादिंडीत सुमारे वारकरी यांची संख्या .
याच प्रमाणे सोनू बाबा कुर्णेकर पायी दिंडी भांबेड सस्थापक अध्यक्ष ह.भ.प.संतोष कुर्णेकर महाराज यांच्या दिंडीत सुमारे दिडशे वारकरी असतात.तसेच पालू येथील ह.भ.प.रामदास नामे यांची पायी दिंडी व मंगेश मेस्त्री आगरगाव यांची दिंडी जांगलदेव मंदिर येथून निगते अशा लांजातून चार दिंड्या पंढरपूरला निघाल्यात.
या चारी दिंड्यात दिवसभर हरीनामाच्या गजरात चालतात . प्रत्येक दिंडी सोबत सामाणा साठी गाडी ठेवली जाते.दिवसभर हरीनामाचा गजर, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन जागर, पहाटे काकड आरती होऊन दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्त होते.आसगे येथील मुक्कामाच्या ठिकाणी कोयना नगरचे सुप्रसिद्ध किर्तनकार दिंगबर सुतार यांचे किर्तन झाले.