लांजा : अजिंक्य मंगल कार्यालयाचे मालक कुरूप यांच्या गणपतीचे विसर्जन २१व्या दिवशी ओझरावर झाले. गणपती आल्यापासून ते गणपती जाई पर्यंत रोज रात्री करमणूकी साठी विविध धार्मिक अध्यात्मिक असे कार्यक्रम दररोज केले जात होते.ज्ञानेश्वर माऊली हरीपाठ सोनूबाबा कुर्णेकर पायी दिंडी संस्था भांबेड ह.भ.प.संतोष महाराज कुर्णेकर भांबेड, चैतन्य वारकरी सांप्रदाय आगरवाडी वारकरी मंडळ ह.भ.प.दर्शन महाराज आग्रे,कुळदिप आआग्रे, दिपक रामाणे,यांचा माऊली हरीपाठ, आदिनाथ वारकरी मंडळ गवाणे यांचा माऊली हरीपाठ, विश्व हिंदू परिषद यांचे भजन, यांनतर संगित भजने असे कार्यक्रम रोज ठेवले जात होते.
काळ भव्य दिव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली व ओझरावर गणपतीचे विसर्जन करण्यात आले.