लांजा : लांजा येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी चेतन शिंदे यांच्या निवासस्थानी लांजा नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.
लांजा नाभिक वाडी येथील चेतन शिंदे यांच्या निवासस्थानी पुण्यतिथी संपन्न झाली. नाभिक समाजातील कार्यकारिणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सल्लागार,सदस्य व समाज बांधव उपस्थित होते. यादिवशी समाजातील समाज बांधवांनी आपली सलून दुकाने बंद ठेवली होती.पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन,हरीपाठ,भजन असे कोणतेच कार्यक्रम झालेले नाहीत.
