लांजा: तालुक्यातील केळवली, वरचीवाडी येथे श्री देव धावबा बाकयजी सेवा संस्था वरचीवाडी यांच्या वतीने श्री देव धावबा बाकयजी यांच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा सोहळा उत्सवासह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा हे मुख्य आकर्षण ठरणार आहे . तर शनिवार १८ एप्रिल सकाळी अभिषेकाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सायंकाळी ४ ते ६ वेळेत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रविवार १९ एप्रिल रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद (भंडारा) व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रात्री जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ९,९९९ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७,७७७ रुपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच सहभागी संघांनाही मानधन व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.