लांजा: लांजा तालुक्यात इंदवटी येथील ह.भ.प.देऊ कृष्णा इंदवटकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या मुलगा नितीन याचे लग्न झाले.त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली.व ज्ञानेश्वर माऊलींचा हरीपाठ ठेवण्यात आले होते. या हरीपाठासाठी लांजा,आगरगांव,गवाणे, वेरवली,धुंदरे,इंदवटी या गावचे वारकरी सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यावर भोजन महाप्रसाद देण्यात आले.व करमणूकीसाठी रात्री नमन ठेवण्यात आले.ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला तो परीसर विजे तोरणांनी अर्धा किलोमीटर भागाततोरणानी लखलखाट, झगमगाट शोभून दिसत होता.असा हा कार्यक्रम भव्यदिव्य झाला.