रोहा : दि. १०/०४/२०२६ रोजी रोहा तालुक्यातील चणेरा मंडळात ‘महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराचे अध्यक्ष तहसीलदार रोहा, डॉ. किशोर देशमुख असून, या शिबिरात रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती उर्वशी वाडकर, चणेरा पंचक्रोशीतील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वितरण विभाग, पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शासकीय विभाग प्रमुख, सर्व नायब तहसीलदार व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांना तहसीलदार रोहा यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली तसेच लाभही घेतला. नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट, संजय गांधी योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना मंजुरी व सातबारा इत्यादी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन करण्यासाठी चणेरा मंडळ अधिकारी श्री. प्रकाश मोकल यांच्या प्रयत्नांमुळे व मार्गदर्शनाखाली सर्व तलाठी व कोतवाल यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
