नाशिक : इगतपुरी तालुक्यात मुंबई-नाशिक महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कसारा बंधारा ते ओहळाचीवाडी दरम्यान दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती वाहून आली.
त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली असून, सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. दरड कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना झालेली नाही. दरम्यान, रस्त्यावर आलेले दगड आणि माती हटवण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
