मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे केंद्र सरकार महिलांना राजकीय आरक्षण मिळवुन देण्यास कटिबध्द आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी हाणुन पाडले. परंतु महिलांना लोकसभा आणि विधानसभा मध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मोदी सरकार कटिबध्द आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर येवुन प्रगती झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे धोरण आहे, त्यामुळे देशाचा विकास होत आहे. मेक इन इंडिया, या संकल्पनेचे देशात आणि जगातही कौतुक झालेले आहे. देशात विकासाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. एक दिवस निश्चित भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येईल असा आम्हाला विश्वास आहे. त्या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.