मुंबई : येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक पचनविकार तज्ञ डॉ. पुष्कर वाघ यांची एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विशेष ओपीडी..
खेड–चिपळूण परिसरातील पचनसंस्थेशी संबंधित विविध विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आरोग्य सुविधा आता उपलब्ध झाली आहे. मुंबई येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक पचनसंस्था विकार तज्ञ डॉ. पुष्कर वाघ हे आता एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घानेखुंट–लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे नियमितपणे रुग्णसेवा देणार आहेत.
डॉ. पुष्कर वाघ यांची विशेष ओपीडी ऑक्टोबर २०२६ पासून दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हॉस्पिटलमध्ये सुरू होत आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनियमित आहार, जंक फूडचे वाढते सेवन, जेवणाच्या वेळेतील अनियमितता, अपुरी झोप, सततचा मानसिक ताण, व्यायामाचा अभाव तसेच बदलत्या आहारपद्धती यांचा पचनसंस्थेच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी आम्लपित्त, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी तसेच इतर पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
अशा परिस्थितीत आयुर्वेदामध्ये आहार, दिनचर्या, जीवनशैलीतील बदल आणि व्यक्तिनिहाय उपचारपद्धतीला विशेष महत्त्व दिले जाते. पचनशक्ती संतुलित ठेवणे, योग्य आहार-विहाराचा अवलंब करणे आणि आजाराच्या मुळाशी जाऊन उपचार करण्याच्या आयुर्वेदिक दृष्टिकोनामुळे पचनसंस्थेच्या विकारांच्या व्यवस्थापनात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे केवळ लक्षणांवर उपचार न करता योग्य निदान, आहार-विहारातील सुधारणा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे आवश्यक आहे.
डॉ. पुष्कर वाघ यांच्या विशेष ओपीडीमध्ये पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी, वारंवार होणारे पोटदुखीचे त्रास, आतड्यांचे विकार, आम्लपित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय यासंबंधीचे आजार तसेच इतर पचनविकारांबाबत आयुर्वेदिक पद्धतीने तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार घेण्याची सुविधा रुग्णांना मिळणार आहे.
खेड, चिपळूण तसेच परिसरातील रुग्णांना पचनविकारांसाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता कमी होऊन स्थानिक पातळीवर तज्ज्ञ आयुर्वेदिक मार्गदर्शन व उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पचनविकारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या विशेष ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.
अपॉइंटमेंटसाठी संपर्क
सौ. सुश्मिता पाटील – 7775972441
श्री. संजय आंब्रे – 9797977018
एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
घानेखुंट–लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी
फोन : 02356-661500-01
मुंबई चे प्रसिद्ध आयुर्वेदिक पचनविकार तज्ञ आता आपल्या परशुराम हॉस्पिटलमध्ये…
