पनवेल (वैभव लबडे) : तालुक्यातील पोयंजे येथे आज एका कोल्ड्रिंकच्या डब्यात घराशेजारी नाग शिरल्याने त्याला बाहेर येणे शक्य नव्हते. मात्र, भिंगार येथील सर्पमित्रांनी वेळेवर पोहोचून या नागाला अत्यंत कौशल्याने बाहेर काढून त्याला जीवदान दिले.
सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी मयूर मुंडे हे त्यांच्या घराशेजारी फेरफटका मारत असताना त्यांना कोल्ड्रिंकच्या डब्यात सापाचा डोका दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र प्रतीक शेंद्रे यांनी आपले सहकारी अक्षय लबडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर नागाला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.
या नागाला मानवी वस्तीपासून दूर, सुरक्षित अशा नैसर्गिक अधिवासात (जंगलात) मुक्त करण्यात आले. “साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, त्यांना मारू नका,” असे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले.
या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांचे आभार मानले असून त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
