जळगाव:- नीटचे पेपर फोडल्या प्रकरणी महाराष्ट्रातून शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील पोलीस भरती अंतर्गत येणाऱ्या SRPF लेखी पेपरफुटीच्या आरोपींना कधी अटक होणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
नीट पेपरफुटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पोलीस भरती अंतर्गत येणाऱ्या SRPF लेखी पेपरफुटी प्रकरणी एसआयटीची स्थापना करावी व आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
