रसायनी (राकेश खराडे) : भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 305 या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेद्वारे सुरु होता. दरम्यान HC अमोल हंबीर आणि PC ईश्वर लांबोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेष्ण करुन तपास पथकाने संशयीत आरोपीत यास गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने ऑनलाईन रमी खेळात खूप मोठया प्रमाणात पैसे हरल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
आरोपी यास पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाई करिता पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे . आरोपी आदित्य अमृत कुथे, वय 23 वर्ष, रा. मुंढानी, पोस्ट बेनसे, तालूका पेन असे असून त्यांच्याकडून घरफोडीचे पाच विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
