खेड : तालुक्यातील तिसंगी-शिवाजीनगर येथील डुबी नदीकिनारी असलेल्या झाडांच्या झुडुपात हातभट्टीची दारू गाळीत असताना ८८ हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू अन्य साहित्यासह जप्त करण्यात आली आहे. हि कारवाई दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ११:४० वाजता करण्यात आली.
खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुळवंडी येथील यशवंत गौराजी शिर्के (६०) हे तिसंगी शिवाजी नगर येथील डुबी नदीकिनारी असलेल्या झाडांच्या झुडुपात हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी बांधून गाळीत असताना तसेच २५००/-रुपयाचे एक अल्युमियमचे पसरट भांडे, १,५००/- रुपयांचे १० लीटर गरम उकळते रसायन या साहित्यासह ७ हजार रुपये किंमतीची ७० लीटर गावठी हातभट्टीची दारू ७७ हजार रुपये किंमतीच्या २२०० लीटर मध्ये गूळ नवसागर मिश्रित कुजके खंड रसायन असा एकूण ८८ हजार रुपये किंमतीचा मिळून आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेड पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई नितीन रामदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ७ जून २०२६ रोजी सायं. ४:०९ वाजता संशयित आरोपी यशवंत गौराजी शिर्के याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.