मुंबई – महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना केंद्रसरकारकडून आवश्यक मदत मिळावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
तसेच रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणासाठी केंद्रसरकारकडून निधी मंजूर झाला असून, या महत्त्वपूर्ण विकासकामाच्या भूमिपूजनासाठी वेळ द्यावी, अशी विनंतीही सुनिल तटकरे यांनी केली. शिवाय महाराष्ट्रातील जनतेला आवश्यक मदत मिळावी व रायगडच्या विकासाला गती मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे असेही सुनिल तटकरे यांनी ‘एक्स’ वर स्पष्ट केले आहे.
