चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, जुने व सक्रिय कार्यकर्ते मनोहर खेडेकर यांची पक्षाच्या चिपळूण तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ही नियुक्ती चिपळूण तालुकाध्यक्ष राजेश (अविनाश) केळसकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी मनोहर खेडेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नियुक्तीपत्र प्रदान करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश अप्पा खेडेकर, चिपळूण तालुका कार्याध्यक्ष शिरीषभाऊ खाटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतोडेकर,महीला तालुका अध्यक्ष अरुता आडविलकर,चिपळूण शहराध्यक्ष समीर देसाई, महिला शहराध्यक्षा रुखसार अल्वी,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष रईस अल्वी,युवक शहराध्यक्ष मुन्ना जसनाईक,सत्येंद्र सिंह,रूपेश पालशेतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोहर खेडेकर यांच्या दीर्घकाळाच्या पक्षनिष्ठेचा गौरव करत, त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल आणि पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
नियुक्तीनंतर मनोहर खेडेकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
