मुंबई दि. 16 – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेला रिपब्लिकन पक्ष 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झाला.त्या नंतर च्या काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट झाल्याने समाजाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे.समाजातील विविध रिपब्लिकन गट बरखास्त करून एकच रिपब्लिकन पक्ष उभा केला पाहिजे.
जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात मात्र ते इतर राजकीय पक्षात काम करतात त्यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. घाटकोपर पश्चिम येथील कच्छी कडवा पाटीदार वाडी सभागृहात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ना रामदास आठवले बोलत होते.राज्यसभेत सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची निवड झाल्याबद्दल घाटकोपर मधील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी शिवसेने चे माजी विधानसभा संपर्क प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक मोहन वाघमारे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा च्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात यावेळी जाहीर प्रवेश केला.
