मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि आमदार इद्रीस नायकवडी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत.

मध्यंतरीच्या काळात आमदार इद्रीस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत पक्षातून सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता. मुंबईत आल्यावर या संदर्भात भेट घेऊन चर्चा करू असे त्यांनी सांगितले होते, त्यानुसार या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या राजीनाम्याबाबत काय अंतिम निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर नायकवडी स्वतः माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.