जळगाव:- संपूर्ण देशभरात पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरावरून संतापाची लाट पहायला मिळत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी चारोळीतून तर रोहिणी खडसेंनी कवितेतून सरकारवर निशाणा साधला आहे.

निवडणूक झाली.. आता वसूली सुरू… निवडणूक असेपर्यंत….. सर्व कंट्रोलमध्ये ठेवू…..निवडणूक झाली..आता वसूली सुरू…आधी एलपीजी गॅसच्या दरांचा उडाला भडका…आता पेट्रोल डिझेल भावात दरवाढीचा तडका..पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय होती झगमगाटात..सत्ताधारी पक्षांचा वेगळाच होता थाट…काय रॅल्या, काय रोड शो, काय ग्रँड होत्या सभा..करोडोंचा खर्च केला, आता परतावा तर हवा ?छोडो भाई, काहे की टेन्शन !जनतेच्या खिशावर डल्ला मारूनिवडणूक झाली..आता वसूली सुरू…अच्छे दिन म्हणता म्हणता..सामान्य माणूस लागला मरू…निवडणूक झाली.. आता वसूली सुरू…