आगरवायंगणी : ‘श्री स्वराज्य प्रतिष्ठान, दापोली’ च्या वतीने नुकताच त्यांच्या पहिल्याच समाजोपयोगी कार्यक्रमाचे शिरसोली येथे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बी. आर. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण, पर्यावरण आणि विद्यार्थी गुणगौरवाचे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून पुरस्कार मिळालेल्या ‘पूर्ण प्राथमिक मराठी शाळा शिरसोली नं. १’ चा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी शिर्सेश्वर मधील विद्यार्थ्यांना शालेय व उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याशिवाय, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये घवघवीत यश मिळवून शिष्यवृत्ती संपादन करणारा गुणवंत विद्यार्थी चि. पार्थ सुनील जाधव याचाही विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर सर, शिक्षक विजय फंड सर, तांबिटकर गुरुजी, कालेकर गुरुजी, अंगणवाडी सेविका वैभवी मोरे तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ गणू भावे, सुनील जाधव, अरविंद जाधव, संतोष जाधव, सिद्धार्थ महाडिक, रवींद्र जाधव, कोंडीबा जाधव, शालेय कमिटी अध्यक्ष विवेक भावे, शंकर पार्वती ट्रस्टचे ट्रस्टी सुरेश जाधव तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुधीर जाधव, खजिनदार अमर मोरे , सहखजिनदार विशाल रेवाळे, सल्लागार दीपक जाधव, सदस्य राजीव पिंपळे, संदीप महादवे, दीपक मोरे, परेश घाग, मानस मोरे, कुणाल शिगवण, प्रवीण ढगे, संतोष जाधव, नंदकिशोर पाताडे, सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व सभासद आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव, लेखक कवी जयवंत चव्हाण ह्यांनी प्रभावीपणे केले. सर्वांच्या अथक परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.